राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. सध्याचे झारखंडचे राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तर, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरी भाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
तेलंगणात, त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांची, सिक्कीममधे माजी राज्यसभा खासदार ओमप्रकाश माथुर, झारखंडमधे माजी केंद्रीय मंत्री संतोष कुमार गंगवार, छत्तीसगडमधे माजी खासदार रामेन डेका, तर मेघालयात कर्नाटकचे माजी मंत्री सी एच विजय शंकर यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
सध्या आसामचे राज्यपाल असलेले गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामबरोबरच मणिपूरच्या राज्यपाल पदी नियुक्ती केली आहे. तर माजी आयएएस अधिकारी के. कैलाशनाथ यांची पुद्दूचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.