डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 12, 2024 3:34 PM | By-elections

printer

देशातल्या इतर राज्यातल्या विधानसभा आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी तयारी पूर्ण

देशातल्या इतर राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या पाच, बिहारमधे विधानसभेच्या चार जागांसाठी तर केरळात लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी उद्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 
 
 
आसाममधे ३४ उमेदवार रिंगणात असून ९ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी एक हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. समागुरी मतदारसंघात अनेक हिंसक घटना झाल्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत सर्व जागांवर सत्तारूढ भाजपा, आसाम गण परिषद, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि काँग्रेस या पक्षांमधे थेट लढती होतील.    
 
 
बिहारमधे इमामगंज, बेलागंज, तरारी आणि रामगड या मतदारसंघात उद्या पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी ३८ उमेदवार आपलं भविष्य आजमावणार असून १२ लाखाहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. गया, भोजपूर आणि कैमूर जिल्ह्यात १ हजार २७७ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री जितन राम मांझा, राजद प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंग, राजदचे माजी मंत्री सुरेंद्र प्रसाद यादव हे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केरळात वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी तसंच छेलक्करा राखीव विधानसभा मतदारसंघासाठी उद्या पोटनिवडणूक होत  आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. वायनाडमधे युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या तिकिटावर काँग्रेसच्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. त्यांच्या विरोधात एलडीएफचे सत्यन मोकेरी आणि भाजपाच्या नव्व्या हरिदास निवडणूक लढवत आहेत. एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा