डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापार भागीदार देश

भारताच्या अमेरिकेसोबत व्यापार संबंध अधिक भक्कम करण्यासाठी गहन चर्चा- परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांची माहिती
भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी गहन चर्चा करण्यात येत असून ऊर्जानिर्मितीक्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ आणि स्थिर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

 

भारताच्या दूरदर्शी विकासासाठी ते आवश्यक असल्याच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल सांगितल. नवी दिल्लीत एशिया सोसायटीतर्फे आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

 

अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागासाठीच्या व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लींच या सध्या पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या ट्रॅमप सरकारच्या काळात दोन्ही देशा दरम्यानच्या संरक्षण क्षेत्रातील संबंधांमध्येही अधिक वाढ होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

2023 मध्ये भारत आणि अमेरिका दरम्यान वस्तु आणि सेवा संदर्भातील व्यापार 190 अब्ज डॉलर्स होता आणि अमेरिका भारताचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापार भागीदार देश ठरला. तसच 2023-24 या वर्षात अमेरिकेने भारतात 5 अब्ज डॉलर्सची प्रत्यक्ष गुंतवणूक करत भारताचा तिसरा सर्वात मोठा विदेशी गुंतवणूक भागीदार देश ठरला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा