अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार इथल्या चंदन मेडीकोज या औषध विक्रेत्याने दडवून ठेवलेल्या सुमारे २४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा अवैध औषधांचा साठा जप्त केला. या साठ्यामध्ये कामोत्तेजक औषधांचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या अवैध औषध साठ्यातल्या काही औषधांचे नमुने घेतले असून त्याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. संबंधित औषध विक्रेत्यानं अनेक नियमांचं उल्लंघन केलं असल्यानं त्याच्यावर १९४० च्या औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यांततर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
Site Admin | December 21, 2024 6:41 PM | Buldhana