बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातल्या ‘प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाची कालपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे देशभरात सुरु झालेल्या ‘देश का प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाअंतर्गत आयुर्वेदानुसार नागरिकांची प्रकृती कोणत्या प्रकारची आहे याचं अनुमान काढलं जात. त्यासाठी आयुष मंत्रालयाने ‘प्रकृती परीक्षण’ नावाचं ऍप विकसित केलं आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या ॲपचा वापर करुन मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आल आहे.
Site Admin | December 6, 2024 7:32 PM | Buldhana
बुलढाण्यात ‘प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाची सुरुवात
