काँगो देशात मार्च २३ मुव्हमेंट या सशस्त्र दलानं आपल्या सैनिकांनी दक्षिण किवू प्रांताची राजधानी बकावू शहरात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. दक्षिण किवू प्रांताला महत्त्वाची मानवतावादी आणि लष्करी मदत पोहचवण्याचं केंद्र असलेलं कावूमु विमानतळही ताब्यात घेतल्याचं या दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
बकावूतल्या रहिवाश्यांनी आपली सुरक्षा करण्यासाठी निगराणी गट तयार करावेत अशी सूचना या गटानं दिली आहे.
१९९४ मधला रंवांडतला वंश संहार तसंच अनेक वर्षांपासून तुत्सी आणि हुतू समुदायातला वांशिक तणाव हेच मार्च २३ मुव्हमेंट आणि सरकार यांच्यातल्या संघर्षाचं मुख्य कारण असल्याचं विश्लेषकांचं मत आहे.