संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. 31 जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात, लोकसभेत 118 टक्के काम झालं आणि 16 विधेयकं संमत झाल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. तर राज्यसभेत या अधिवेशन काळात 119 टक्के कामकाज झालं; आणि 14 विधेयकं संमत झाली असं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं.
अधिवेशनात भरीव कामकाज झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत 14 तास, तर राज्यसभेत 17 तास चर्चा झाली, चर्चेदरम्यान एकदाही व्यत्यय आला नाही, असं रिजीजू यांनी सांगितलं. दरम्यान सरकारनं वक्फ सुधारणा विधेयक बळजबरीनं मंजूर करून घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला; हा आरोप रिजिजू यांनी फेटाळून लावला. सभापती ओम बिर्ला यांनीही सोनिया गांधी यांचं हे विधान दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
Site Admin | April 5, 2025 8:26 AM | अर्थसंकल्पीय अधिवेशन | संसद
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; दोन्ही सभागृहांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक कामकाज
