डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वित्तविधेयक २०२५ आणि विनियोजन विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर

वित्तविधेयक २०२५ आणि विनियोजन विधेयक २०२५ चर्चा करुन राज्यसभेनं आज लोकसभेला पाठवलं. लोकसभेत आधीच या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी चर्चेला प्रारंभ केला. अन्न, शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात महागाई झाली असून  बेरोजगारी वाढत आहे असं ते आपल्या भाषणात म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष म्हणाल्या, की गरीबांची क्रयशक्ती आणि खासगी गुंतवणूक घसरत आहे. करआकारणी जास्त होत असल्याने भारतात उपभोगाचं प्रमाण कमी झाल्याचा दावा आपचे राघव चढ्ढा यांनी केला. केंद्र सरकारने लाखो तरुणांमधे कौशल्यविकास घडवून आणला असून ग्रामीण भागातही स्वतःची वाहनं, विजेवरची उपकरणं, आणि काँक्रीटची घरं दिसतात असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा