राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं आज सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला. त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज सुरु झालं.
लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी देशाच्या विकासात माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तसंच मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि ३ माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.