युवांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकासाच्या दृष्टीने सरकारच्या पाच योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्या.
अर्थसंकल्पात युवांसाठी महत्त्वाच्या योजना :
नोकरीच्या सुरुवातीला आर्थिक सहाय्य, उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती, नोकरी देणाऱ्यांना आर्थिक सहाय्य, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिला-केंद्रित कौशल्यविकास, महिलांसाठी वसतिगृहं, तसंच पाळणाघरांची उभारणी इत्यांदीचा समावेश आहे.
कौशल्यविकासासाठी कर्जं, शैक्षणिक कर्जं या क्षेत्रातही सरकारनं नवीन योजना आणल्या आहेत, असं सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलं. देशातल्या सर्वोत्तम ५०० कंपन्यांमध्ये युवकांना इंटर्नशिप आणि प्रत्येकाला ५ हजार रुपये देण्याबाबतचं धोरणही सरकारनं जाहीर केलं. पहिल्या पाच वर्षांमध्ये १ कोटी युवकांना याचा फायदा होईल, असा अंदाज अर्थमंत्र्यांनी वर्तवला.