२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १४० कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब दिसतं अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. देशातले नागरिक विकासाचे भागीदार बनतील, याचा पाया या अर्थसंकल्पानं घातला आहे, रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्राला प्राथमिकता दिली गेली आहे, असं ते म्हणाले. यामुळे गुंतवणूक, बचत वाढीला लागेल तसंच देशाच्या प्रगतीला वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पामुळे कृषी क्षेत्राचं सक्षमीकरण होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होईल, तसंच लघु उद्योगालाही यामुळे चालना मिळेल असं प्रधानमंमत्री म्हणाले. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीयांपासून स्टार्ट अप, नवोन्मेष आणि गुंतवणूकीपर्यंत सर्वांसाठी या अर्थसंकल्पात काहीतरी आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. मध्यमवर्गीयांना दिलेल्या आयकर सवलतींचं नितीन गडकरी यांनी स्वागत केलं.
Site Admin | February 1, 2025 7:57 PM | Budget 2025 | Modi
देशातल्या नागरिकांना विकासाचे भागीदार बनवण्याचा पाया घालणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रशस्ती, तर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका
