प्रत्येकाच्या आकांक्षाचा अर्थसंकल्प असून भारतीयांच्या स्वप्नांना पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. देशातल्या नागरिक विकासाचे भागीदार बनतील याचा पाया या अर्थसंकल्पाने घातला आहे, रोजगाराच्या प्रत्येक क्षेत्राला प्राथमिकता दिली गेली आहे, असं ते म्हणाले.
या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीयांपासून स्टार्ट अप , नवोन्मेष आणि गुंतवणूकीपर्यंत सर्वांसाठी या अर्थसंकल्पात काहीतरी आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
मध्यमवर्गीयांना दिलेल्या आयकर सवलतींचं नितीन गडकरी यांनी स्वागत केलं. हा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सहाय्य्यभुत ठरेल असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले.