केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक वृद्धीला चालना, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन, सर्वसामान्यांच्या आकांक्षांना उभारी देणारा आणि मध्यमवर्गाला आणखी बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. हा अर्थसंकल्प कर निर्धारण, ऊर्जा, शहरी विकास, खाणकाम, वित्त आणि नियामकीय क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारा आहे, असंही त्या म्हणाल्या. मात्र अर्थसंकल्प सादरीकरण सुरू झाल्यावर कुंभमेळ्यातल्या दुर्घटनेच्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी लाक्षणिक सभात्याग केला होता.
Site Admin | February 1, 2025 1:54 PM | Budget2025 | Finance Minister Nirmala Sitharaman
गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य देणारा, सर्वांचा विकास साधणारा अर्थसंकल्प
