डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रातली बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थस्थळांचा विकास करण्यात येणार – किरेन रिजिजू

महाराष्ट्रातली बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थस्थळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळं तसंच स्मारकं यांचा विकास करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. नागपूरमधे पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

 

या कामासाठी संबंधित सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था या सर्वांसोबत समन्वय साधण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. किरेन रिजीजू आज प्रदेश भाजपा कार्यालयातर्फे आयोजित बैठकीत सहभागी होणार असून, अनुसूचित जाती मोर्चाच्या एका बैठकीला संबोधित करणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा