बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सात नव्या ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केल्या आहेत. कंपनीचं नवीन बोधचिन्ह आणि सात नव्या सेवांचं अनावरण करताना केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याबद्दल माहिती दिली. स्पॅम-फ्री नेटवर्क, नॅशनल वाय-फायरोमिंग, इंट्रानेट फायबर टीव्ही, एनीटाइम सिम किओस्क, डायरेक्ट-टू-डिव्हाइस सेवा, सार्वजनिक संरक्षण – आपत्ती निवारण आणि खाणींमध्ये प्रथमच फाइव्ह-जी या सेवांचा त्यात समावेश आहे.
फायबर टू द होम सेवेद्वारे ग्राहकांना बीएसएनएल हॉटस्पॉट्सवर नॅशनल वाय-फाय रोमिंग सुविधाही मोफत दिली जाईल. आपला देश हा स्वतःची फोर-जी दूरसंचार सेवा विकसित करणाऱ्या जगातील सहा देशांपैकी एक असून आता फाइव्ह-जी सेवाही लवकरच सुरू होणार आहे, असंही सिंधिया यांनी सांगितलं.