डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 20, 2024 8:33 PM | BSNL 4G | Nagpur

printer

नागपूरच्या १३७ गावांमध्ये बीएसएनएलची 4-जी सेवा उपलब्ध

महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या १३७ गावांमध्ये जेथे कुठलीही मोबाईल सेवा नव्हती तेथे बीएसएनएलची 4 -जी सेवा आता उपलब्ध होत आहे. देशात 4-जी स्तरावरची मोबाईल सेवा असली पाहिजे या उद्देशाने देशातल्या १ लाख गावांपैकी ज्या ३४ हजार गावात कोणतीही सेवा नव्हती त्याठिकाणी बीएसएनएलच्या 4 जी सेक्युरेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत बीटीएस टॉवर लावून 4-जी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प बीएसएनएलने हाती घेतला आहे. या माध्यमातून नागपूर-मध्य प्रदेश सीमेवरच्या पारशिवनी, रामटेक अशा तालुक्यातल्या दुर्गम गावांमध्ये सुद्धा 4-जी सेवा पोचली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा