सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडला २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथे ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या १७ वर्षांत प्रथमच बीएसएनएलने तिमाही नफा नोंदवला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दूरसंचार क्षेत्र हे भारताच्या डिजिटल भविष्याचा मार्ग असेल, असंही शिंदे यावेळी म्हणाले.
Site Admin | February 14, 2025 8:15 PM | BSNL
१७ वर्षात पहिल्यांदाच BSNL ला तिमाही निकालात नफा
