अल्बानियात तिराना इथं सुरू असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विश्वजित रामचंद्र मोरे या कुस्तीगीरानं कांस्यपदक पटकावलं. त्यानं पुरुषांच्या ५५ किलो ग्रीको रोमन गटात अॅडम उलबाशेव्हचा १४-१० असा पराभव केला. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलचं पदक आहे. इराणच्या अली अब्दुल्लाअहमदी वफानं सुवर्ण, रशाद मम्मादोव्हनं रौप्य तर जपानच्या कोहेल यामागिवानं मोरे याच्याबरोबर कांस्यपदक पटकावले. महिलांच्या ५९ किलो वजनी गटात भारताच्या अंजलीनं अंतिम फेरी गाठली. काल उपांत्य फेरीत तिनं इटलीच्या अरोरा रुसोचा ४-० असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना युक्रेनच्या सोलिमिया विनिकशी होणार आहे.
Site Admin | October 24, 2024 3:44 PM | wrestling
२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विश्वजित मोरेनं पटकावलं कांस्यपदक
