ब्रिटनमध्ये 2023 मध्ये उच्चांकी 9 लाख 6 हजार परदेशी नागरिकांनी स्थलांतर केल असून ते 2022 पेक्षा जास्त असल्याचं आढळून आल्याने, ब्रिटनच्या स्थलांतर धोरणामध्ये दुरुस्ती करून योग्य निर्णय घेतले जातील, असं ब्रिटनचे प्रधानमंत्री स्टीर कारमर यांनी जाहीर केल आहे .
ब्रिटनच्या राष्ट्रीय सांखिकी कार्यालयाच्या संशोधन अहवालानुसार जून 2024 पर्यन्त ब्रिटनमध्ये सुमारे 12 लाख स्थलांतरित नागरिक आले आणि 4 लाख 79 हजार नागरिकांनी ब्रिटन देश सोडला. त्यामुळे स्थलांतरितांमध्ये प्रत्यक्षात जून 2023 ते जून 2024 या वर्षात 20 टक्क्यांची घट झाली असून ते 7 लाख 40 हजार आहेत. मात्र 2020 च्या बेक्झिटनंतर स्थलांतरितांचा आणि सीमा सुरक्षेचा प्रश्न तिथ ऐरणीवर आला असून, यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रश्नावरून कंजरवेटिव्ह पक्षाचे प्रधानमंत्री ऋषि सुनक यांच्या सरकारला पायउतार व्हावं लागलं होत आणि स्थळांतरितांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देणाऱ्या लेबर पार्टीला विजय मिळाला होता. लेबर पार्टीचे सध्याचे प्रधानमंत्री स्टीर कारमर यांनी हा प्रश सोडवण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे .