डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 1, 2024 8:56 AM | Badminton | India

printer

बॅडमिंटनमध्ये भारताच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

सय्यद मोदी भारतीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सेननं जपानच्या शोगो ओगावाचा २१-८, २१-१४ असा पराभव केला. अंतिम सामन्यात लक्ष सेनची लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहशी होईल. दरम्यान भारताच्या पी व्ही सिंधूनंही महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिनं भारताच्याच उन्नती हुडाचा २१-१२, २१-९ असा पराभव केला. अन्य एका स्पर्धेत, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुलेला या भारतीय जोडीनंही महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी थायलंडच्या बेन्यापा एम्सार्ड आणि नंटकर्ण एम्सार्ड यांचा 18-21, 21-18, 21-10 असा पराभव केला. तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीनं चीनच्या झाऊ झी हाँग आणि योंग जी यी या जोडीवर २१-१६, २१-१५ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा