अमेरिकेच्या डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन चलन सुरु करण्याचा ब्रिक्स देशांचा कोणताही विचार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. ते कतरच्या राजधानीत आयोजित दोहा फोरममध्ये बोलत होते. अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या मुद्द्यावर ब्रिक्स सदस्य देश एकमत नाहीत, असंही ते म्हणाले. ब्रिक्स देशांनी जर सामायिक चलन योजना सुरू केली तर या देशांना शंभर टक्के सीमा शुल्क द्यावं लागेल अशी चेतावणी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका आठवड्यापूर्वी दिली होती.
Site Admin | December 8, 2024 1:34 PM | BRICS countries | Foreign Affairs Minister | US dollar
अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नाही – परराष्ट्र व्यवहार मंत्री
