अमेरिकेतली सर्वात मोठी आरोग्य वीमा कंपनी युनायटेड हेल्थकेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉमसन यांची काल न्युयॉर्कमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका चेहरा झाकलेल्या व्यक्तींन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. थॉमसन यांची कट रचून हत्या करण्यात आल्याचं स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुमारे ८१ अरब डॉलर्सची उलाढाल असलेल्या वीमाकंपनीची सुत्र थॉमसन यांनी २०२१ मध्ये हाती घेतली होती.
Site Admin | December 5, 2024 2:09 PM | Brian Thomson | हत्या