केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात होणाऱ्या उडदाच्या आयातीत ब्राझील हा प्रमुख पुरवठादार देश म्हणून उदयास आला आहे. उडदाची आयात 4102 टनावरून वाढून ऑक्टोबर अखेरपर्यंत 22 हजार मेट्रीक टन पेक्षा अधिक होणार आहे.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात भारताच्या उडीद आणि तूर आयातीचा ब्राझील हा प्रमुख स्रोत देश होण्याची शक्यता आहे.