ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं. वीईरा यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझील यांच्या दरम्यान धोरणात्मक भागीदारीला चालना मिळेल, असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि मौरो वीईरा उद्या होणाऱ्या नवव्या भारत-ब्राझील कमिशनच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संयुक्तपणे भुषवतील. यावर्षीचं जी २० चं अध्यक्षस्थान ब्राझीलकडे आहे, या परिषदेतून चांगले परिणाम उपजावेत यासाठी दोन्ही देश चर्चा करणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | August 26, 2024 1:05 PM | Brazil | India