ब्रह्माकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांचं आज पहाटे अहमदाबादच्या जाइडिस रुग्णालयात निधन झालं. त्या १०१ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर १० एप्रिलला सकाळी १० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांचं पार्थिव शरीर ब्रह्माकुमारीचं मुख्यालय शांतिवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय युवा पदयात्रा, सायकल यात्रा यासारख्या अनेक मोहिमांचं यशस्वीरीत्या आयोजन केलं गेलं तसचं ६ हजार सेवा केंद्रांची उभारणी करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रह्मकुमारींच्या आध्यात्मिक गुरू दादी रतनमोहिनी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Site Admin | April 8, 2025 7:17 PM | Brahma Kumari | Passes Away | Ratanmohini
ब्रह्माकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांचं निधन
