ब्राझीलमधे फोज दो इगुआचू इथे झालेल्या मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हितेश या खेळाडूने अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांच्या ७९ किलो वजनी गटात त्याने फ्रान्सच्या माकन त्राओरचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान, ५० किलो वजनी गटात भारताच्या जादूमणी सिंग याने, ६० किलो वजनी गटात सचिन सिवाच याने तर ९० किलो वजनी गटात विशाल या तिघांनी कांस्यपदक जिंकलं आहे.