डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 28, 2024 3:27 PM | WinterSession 2024

printer

दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातल्या आजच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 
 
लोकसभेचं कामकाज  सुरू झाल्यावर अदानी लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्यांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी  गदारोळ केला.सभागृहाच्या हौद्यात उतरून सदस्यांनी घोषणाबाजी केली. विरोधी पक्ष देशाच्या हिताशी संबंधित नसलेले मुद्दे उचलत आहे, असं म्हणत लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या जागेवर परतायला सांगितलं, आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला.  मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. 
 
 
राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी अदानी समूह लाचखोरी प्रकरणी चर्चा करण्याची विनंती केली. मात्र, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. 
दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वरचा अहवाल सादर करण्याची मुदत २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ठेवला होता, ते सभागृहानं संमत केला. 
 
 
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या  प्रियंका गांधी वड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र चव्हाण यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.चव्हाण यांनी मराठीतून शपथ घेतली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा