डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स पहिल्यांदाच ७७ हजारांच्या वर आणि निफ्टीही पहिल्यांदाच २३ हजार ५०० अंकांच्यावर स्थिरावला. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सेन्सेक्स ७७ हजारांच्या आणि निफ्टी २३ हजार ५०० च्या वर व्यवहार करत होते. दिवसभर बाजारात हे सातत्य कायम राहिलं आणि दिवसअखेर सेन्सेक्स ३०८ अंकांची तेजी नोंदवून ७७ हजार ३०१ अंकांवर स्थिरावला. 

निफ्टी ९२ अंकांची तेजी नोंदवून २३ हजार ५५८ अंकांवर बंद झाला. मतमोजणीच्या दिवसापासून अवघ्या ८ सत्रांमध्ये सेन्सेक्सनं ५ हजारांहून अधिक अंकांची वाढ नोंदवली आहे. मुंबई शेअर बाजारात ३८४ समभागांनी आज वर्षभरातली उच्चांकी पातळी नोंदवली तर २४ समभाग वर्षभरातल्या निचांकी पातळीवर पोहोचले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा