खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी काल चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. प्रियांका इंगळे हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघानं काल सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियावर 175-18 असा दणदणीत विजय मिळवला. तर अटी-तटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघानंही ब्राझीलवर 64-34 गुणांनी मात केली. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकरला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आलं. पबरी साबरला सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.
Site Admin | January 15, 2025 9:30 AM | India | kho-kho world cup