डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबंध बहुआयामी आणि दृढ होतील, असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास

भारत आणि मेक्सिको या दोन्ही देशात परस्पर संबध बहुआयामी आणि दृढ होतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. मेक्सिको इथं होत असलेल्या भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी आयोजित ‘भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक शिखर परिषदेत’ त्या बोलत होत्या. मेक्सिको सिटीचे आर्थिक विकास मंत्री मानोला अलदामा हे देखील या परिषदेत सहभागी झाले होते. भारत देशात औषध निर्मिती, उत्पादन, आणि वाहन क्षेत्रात वाढ होत असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुबलक संधी आहेत, असं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. डिजिटल क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी सक्षम असून दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या अनेक वाटा खुल्या आहेत, असं सीतारामन यांनी यावेळी अधोरेखित केलं.

 

भारत-मेक्सिको मधली भागीदारी, सीमापार सहकार्य आणि फिनटेक-डिजिटल देय-प्रणाली मधल्या नाविन्यपूर्ण कामांसाठी परस्पर देशांमध्ये व्यापक बाजार संधी आहेत , असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. भारतीय उद्योग महासंघ आणि कॉन्सेजो कोऑर्डिनेटर एम्प्रेसरिअल यांच्यातल्या सामंजस्य कराराचा त्यांनी आढावा घेतला.
दरम्यान, मेक्सिकोचे वित्त मंत्री यांनीही सीतारामन यांची भेट घेतली. त्यावेळी दोन्ही देशातले सामायिक अनुभव, सहकार्य आणि भारतातल्या डिजिटल परिवर्तनावर दोन्ही देशांच्या अर्थमंत्र्यांमध्ये विशेष चर्चा झाली. १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान अर्थमंत्री मेक्सिकोच्या दौऱ्यावर असून यावेळी त्या अनेक महत्त्वाचे मंत्रीं आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा