डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

 

लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात अदानी प्रकरण तसंच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधला हिंसाचार या मुद्द्यांवरून गदारोळ झाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र, विरोधकांनी सभागृहाच्या हौद्यात घुसून घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करत आपला विरोध सुरू ठेवला. यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

 

राज्यसभेत, सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी अदानी लाचखोरी प्रकरण, तसंच उत्तरप्रदेशातल्या संभल आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळला. धनखड यांनी सदस्यांना चर्चा करून सभागृहाचं कामकाज सुुरु ठेवण्याचं आवाहन केलं. माक्त्र सभागृहात गोंधळ सुरु राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज प्रथम साडे अकरा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

 

दरम्यान, उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे गंभीर आरोप असून त्यांना अटक करावी, अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. संसदेच्या आवारात ते वार्ताहरांशी बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा