डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बॉर्डर-गावस्कर चषक : भारत – ऑस्ट्रेलियात यांच्यातला तिसरा सामना अनिर्णित

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर – गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला.

 

आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत ८ धावांची भर घालून २६० धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात वेगानं धावा करत ७ बाद ८९ धावा झाल्या असताना डाव घोषित केला, आणि पहिल्या डावातल्या १८५ धावांच्या आघाडीसह भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचं आव्हान ठेवलं.

 

मात्र भारताच्या दुसऱ्या डावात केवळ २ षटकं आणि १ चेंडूचा खेळ झाल्यावर पंचांनी अपूऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवला. त्यानंतर पावसानं हजेरी लावल्यानं खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अखेरीस सामना अनिर्णित राहिल्याचं घोषित केलं गेलं.

 

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातला दीड शतकवीर ट्रॅव्हिस हेड याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. या मालिकेतला चौथा सामना, येत्या २६ डिसेंबरपासून मेलबर्न इथं सुरू होणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एका सामन्यात विजय मिळवल्यानं, मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा