डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट : चौथ्या सामन्यात भारताचा १८४ धावांनी पराभव

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा १८४ धावांनी पराभव केला. ५ सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २ – १नं आघाडीवर आहे. 

दुसऱ्या डावात विजयासाठी ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ १५५ धावात आटोपला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांमध्ये आटोपल्यानंतर सामना जिंकण्यासाठी भारतापुढे ३४० धावांचं आव्हान होतं.  त्याचा पाठलाग करतांना भारताचा डाव केवळ १५५ धावात आटोपला. भारतातर्फे यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक ८४ धावा केल्या. नितीश रेड्डीचं शतक आणि जसप्रित बुमराह नं घेतलेले ५ बळी महत्त्वाचे ठरले तरी भारताला सामाना जिंकता आला नाही. 

दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा