क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथं सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी दरम्यान पाच कसोटी सामने खेळले जातील. भारतीय कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळू शकत नसल्यामुळे जसप्रीत बुमराह हा नेतृत्व करणार आहे. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षण मोर्ने मार्केल यांनी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वगुणाची वार्ताहर परिषदेत प्रशंसा केली. उद्याचा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी सुरू होईल.
Site Admin | November 21, 2024 3:50 PM | Australia | Border-Gavaskar Trophy | India