बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३७ धावांवर आटोपला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली आहे. आज दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात ५ बाद १२८धावा झाल्या होत्या.
पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत १-०नं पुढे आहे. पर्थ इथं झालेल्या पहिल्या कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा विजय मिळवला होता.