ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथे सुरू झाला. यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्क्स लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येक एकेक सामना जिंकला आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३११ धावा झाल्या होत्या.
Site Admin | December 26, 2024 2:09 PM | Border-Gavaskar Trophy