राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडक भाषणांचं संकलन असलेल्या “विंग्ज टू अवर होप्स – खंड एक” या पुस्तकाचं आज राष्ट्रपती भवनात प्रकाशन करण्यात आलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत पुस्तकाच्या ई-आवृत्तीसह इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीचं प्रकाशन केलं. “कहानी राष्ट्रपती भवन की” आणि “राष्ट्रपती भवन-हेरिटेज मीट्स द प्रेझेंट” या दोन पुस्तकांचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
Site Admin | July 18, 2024 8:13 PM | President Droupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडक भाषणांवर “विंग्ज टू अवर होप्स – खंड एक” पुस्तकाचं प्रकाशन
