डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुणे पोर्शे प्रकरण : अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

 

बाल न्याय मंडळानं आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत आरोपीच्या आत्यानं उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद यावेळी आरोपीच्या वकिलांनी केला. हा युक्तिवाद मान्य करत त्याची तत्काळ सुटका करण्याचे आणि आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आरोपीचं समुपदेशन सुरू राहील, असंही न्यायालयानं यावेळी म्हटलं. 

 

 

या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या कुटुंबांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला असला तरी या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई करणारच असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा