बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं दफन करावं आणि येत्या सोमवारपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
आरोपी अक्षय शिंदे याचा गेल्या रविवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचं दफन करायला स्थानिक रहिवाशांकडून प्रचंड विरोध झाला. त्याबाबत आरोपीच्या वडलांनी आज न्यायालयात दाद मागितली, तेव्हा दफनासाठी राज्यसरकार जागा उपलब्ध करुन देईल, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.