कोल्हापूरमधल्या विशाळगड किल्ल्याच्या भोवती असलेलं कोणतंही बांधकाम पावसाळ्यात पाडलं जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. विशाळगड परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवल्यानंतर हिंसाचार उसळल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे निर्देश दिले असून या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशाळगड परिसरात कोणतीही इमारत पाडली तर त्याची जबाबदारी पूर्णतः अधिकाऱ्यांची असेल असं बी. पी. कोलाबावाला आणि फिरदोश यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे. तसंच या हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांवर काय कारवाई केली याची माहिती देण्यासाठी शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी २९ जुलै रोजी न्यायालयात हजर राहावं असंही खंडपीठानं सांगितलं.
Site Admin | July 19, 2024 8:12 PM | Bombay High Court