डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

बदलापूर इथल्या लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीला उद्या महाराष्ट्र बंद करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमोर या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी पार पडली. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायालयानं महाविकास आघाडीचे घटक पक्ष, राज्य सरकार आणि गृहविभागाला नोटीस बजावली असून त्यात न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा