आगामी ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. राष्ट्रीय हरित लवादानं याआधीच गणेशोत्सवाच्या काळात डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घातलेली आहे, त्यामुळे न्यायालयाने या जनहित याचिकेचा विचार करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलानं केली, मात्र, यावर बंदी हरित लवादानं घातली असेल, तर ईदच्या काळात बंदी घालण्याची मागणीही हरित लवादासमोरच करावी, असं उत्तर मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांनी दिलं आणि ही सुनावणी पुढे ढकलायची सूचना केली.
Site Admin | September 10, 2024 6:58 PM | Bombay High Court | Eid-e-Milad