प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार बोडोलँड प्रदेशाच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आसामधल्ये कोक्राझार इथं ऑल बोडो स्टुडन्ट्स युनियनच्या ५७ व्या वार्षिक परिषदेला आज संबोधित करत होते. बोडो करारातल्या सर्व अटी पूर्ण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून ८२ टक्के अटी पूर्ण झाल्या आहेत, असं गृहमंत्री म्हणाले. बोडोलँड प्रदेश आधी हिंसाचारासाठी ओळखला जायचा, मात्र इथले युवक आता मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत, या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. दिल्लीतल्या रस्त्याला उपेंद्र नाथ ब्रह्मा यांचं नाव देण्याची घोषणाही यावेळी गृहमंत्र्यांनी केली.
भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज ईशान्येकडच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.