मुंबईत थंडावलेली प्रतिबंधित प्लास्टिक कारवाई मोहिम आजपासून पुन्हा कडक केली जाणार आहे. २०१८ मधलं प्लास्टिक बंदीचं धोरण आताही लागू असेल, असं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या वापरल्यास, बाजारपेठा, हॉटेल, मॉलसह सामान्य नागरिकांवरही आता नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मुंबई महापालिका, पोलिस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ संयुक्तपणे ही कारवाई करणार आहे. Plastic ban
Site Admin | January 4, 2025 3:57 PM | BMC