डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई महानगरपालिकेचं आगामी आर्थिक वर्षासाठीचं शिलकी अंदाजपत्रक सादर

मुंबई महानगरपालिकेचं २०२५-२६ या वर्षासाठी  ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचं आणि ६० कोटी ६५ लाख रुपये शिलकीचं अंदाजपत्रक आज सादर झालं. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिका  मुख्यालयात महापालिका आयुक्त, तसंच राज्य नियुक्त प्रशासक भूषण गगराणी, यांच्यापुढे ते सादर केलं. यंदाचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत  १४ हजार ४७२ कोटी ६६ लाख रुपयांनी वाढला आहे, तर शिल्लक रकमेत २ कोटी ४३ लाख रुपये वाढ झाली आहे. कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड,  वर्सोवा – दहिसर लिंक रोड ते मीरा भाईंदर पर्यंतचा उन्नत मार्ग या महत्त्वाकांक्षी नागरी वाहतूक प्रकल्पांचा या अर्थसंकल्पात समावेश  आहे. मलनिःसारण प्रकल्पासाठी साडेपाच हजार कोटी, पाणीपुरवठा प्रकल्पासाठी चार हजार कोटी, पर्जन्य जलवाहिन्यांसाठी पाचहजार कोटी, अशी भरघोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा