मुंबई महानगरातल्या हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारल्यामुळे भायखळा आणि बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामावर लावलेली सरसकट बंदी हटवण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली.
प्रदूषण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी हे निर्बंध लादायचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला होता. ते मागे घेतले असले, तरीही हवेच्या दर्जावर महानगरपालिकेचं अत्यंत बारीक लक्ष असणार आहे. महानगरपालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं प्रकल्प आणि विकासकांना बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त गगराणी यांनी दिला आहे.