बृहन्मुंबई महानगरपालिकेने १७ जानेवारी ते २४ जानेवारी या सात दिवसात फेरीवाल्यांकडून सुमारे २ हजार ७६३ साधनसामुग्री जप्त केली आहे. यात अनधिकृत ५४४ हातगाड्या, ९६८ सिलिंडर व १ हजार २५१ इतर साहित्य यांचा समावेश आहे. फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे. मुंबईतली वर्दळीची २० ठिकाणे फेरीवाला मुक्त ठेवण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या तसेच आरोग्यासाठी हानिकारक अशा उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात आहे.
Site Admin | January 28, 2025 6:37 PM | BMC
मुंबईत बीएमसीचा अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरु
