आज रक्षाबंधन हा सणाचं उत्साही वातावरण आहे तर दुसरीकडे या वर्षातली महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे. ही घटना म्हणजे ब्ल्यू सुपर मून. संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर काही वेळानं ब्ल्यू सुपर मून बघता येईल. पुढचे दोन दिवस साध्या डोळ्यांनी हा सुपर ब्ल्यू मून बघता येणार आहे.
ब्ल्यू सुपर मूनच्या दिवशी चंद्र हा नेहमी पौर्णिमेला उगवणाऱ्या चंद्रापेक्षा अधिक मोठा दिसणार आहे. चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार असल्यानं त्याचा प्रकाश नेहमीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक प्रखर आणि आकारही १४ टक्क्यांहून अधिक असणार आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ समजली जात असल्यानं खगोलप्रेमी आणि अभ्यासकांत मोठी उत्सुकता आहे.