अमेरिकेची गायिका केटी पेरी हिच्यासह सहा महिलांचं एक पथक आज ब्लू ओरिजिन या रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या पातळीपर्यंतचा प्रवास करणार आहे. केटी पेरीसह या पथकात टीव्ही प्रेझेंटर गेल किंग, चित्रपट निर्माते केरियन फ्लिन, माजी नासा एरोस्पेस अभियंता आयशा बोवे आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधातल्या मोहीमेच्या संस्थापक अमांडा गुयेन यांचा समावेस आहे. हे उड्डाण पश्चिम टेक्सास इथून दुपारी दीड वाजता सुरू होईल. १९६३ मध्ये रशियन अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा यांच्या ऐतिहासिक एकट्या उड्डाणानंतर आजच्या या मोहिमेत पहिली महिला अंतराळ पथक सहभागी होणार आहे.
Site Admin | April 14, 2025 8:07 PM | America | Blue Origi
ब्लू ओरिजिन रॉकेटच्या माध्यमातून सहा महिलांचं पथक रवाना
