आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज २१ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून कॅप्टन योगेश बैरागी यांना ऑलिंपिक खेळाडू विनेश फोगट यांच्या विरुद्ध उमेदवारी दिली आहे. कृष्णा गहलावत, राई मतदारसंघातून निवडणूक लढवतील. बिमला चौधरी पतौडी मतदारसंघातून तर प्रदीप सांगवान बरोदा विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. फिरोजपूर झिरका मतदारसंघातून नसीम अहमद यांना रिंगणात उतरवण्यात आलं असून पुनहाना विधानसभा मतदारसंघातून एराज खान हे पक्षाचे उमेदवार आहेत. यापूर्वी भाजपनं एकूण ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
Site Admin | September 10, 2024 7:36 PM | BJP | Haryana Assembly elections
हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २१ उमेदवारांची यादी जाहीर
